Loading...
ब्रेकिंग न्यूज :
टीईटीचा 'तो' निकाल रद्दच; मात्र उमेदवारांवरील परीक्षा बंदी उठवली राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम
Satara,Maharashtra,India

शिक्षकांच्या कामात आणखी एकाची भर, ए आय साठी ऑनलाईन कोर्स अनिवार्य

शिक्षकांच्या कामात आणखी एकाची भर, ए आय साठी ऑनलाईन कोर्स अनिवार्य

 पुणे : गेल्या काही काळापासून विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील शिक्षकांच्या पाठीवर शिक्षण विभागाने आता आणखीन एक नवे 'टास्क' दिले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन आणि प्रशासकीय कामकाज प्रभावी करण्यासाठी राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी 'शिक्षकांसाठी एआय साथी' हा ऑनलाइन अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.

हा कोर्स ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. 

आधीच विविध सरकारी कामांमध्ये व्यस्त असलेल्या शिक्षक वर्गातून या नव्या अनिवार्य कोर्समुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आधीच कामांचा डोंगर, त्यात नव्या 'टास्क'ची भर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षक वर्ग केवळ शाळा सांभाळत नसून, त्यांच्यावर सरकारी कामांचा मोठा ताण आहे. मतदान पडताळणी निवडणूक ड्युटी, मतदार याद्या अद्ययावत (SIR) करणे आणि जनगणनेची कामे यांमध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत.

या राष्ट्रीय आणि प्रशासकीय कर्तव्यांमुळे शिक्षकांना आधीच अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत, आता डिजिटल प्रशिक्षणाचा हा नवीन 'टास्क' अनिवार्य करण्यात आला आहे.


दीक्षा' पोर्टलवर अभ्यासक्रम; ३१ ऑगस्टपर्यंतच प्रवेश

'एससीईआरटी' आणि 'कोटक एज्युकेशन फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून, तो 'दीक्षा' पोर्टलवर उपलब्ध आहे. या कोर्सचे उद्घाटन १४ जुलै २०२६ रोजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कोर्ससाठी ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत प्रवेश (नोंदणी) घेता येणार असून, ३० सप्टेंबर २०२६ ही कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. शिक्षकांना 'दीक्षा' ॲप किंवा www.diksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.