Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा
Akola,Maharashtra,India

पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

शिक्षण हक्क निकषाला पोहोचणार बाधा : डॉ. बोर्डे
पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

अकोला : पटसंख्येच्या निकषावरील संचमान्यतेमुळे असंख्य शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. शिक्षकाविना शाळा हे धोरण अन्यायकारक ठरत असल्याची भूमिका विज्युक्टाने मांडली आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक गरजेचे असून त्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

तुकडी निकषाऐवजी विद्यार्थी संख्येच्या आधारावर कार्यभार गणना करतांना त्यासाठीचे प्रचलित सर्व निकष व शासन आदेश अधिक्रमित करून १५ मार्च २०२४ च्या शासन आदेशात दिलेल्या पटसंखेच्या निकषानुसार संचमान्यता केली जात आहे. २००९ च्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदे भरली जात होती.

मात्र, शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशानुसार त्यात बदल झाल्याने शिक्षण हक्क कायद्यातील निकष सुद्धा बाधित होत आहेत. यामुळे अनेक शाळा एकच किंवा शुन्य शिक्षकी होतील. ४० च्याऐवजी ३९ विद्यार्थी संख्या झाल्यास शुन्य शिक्षक अशी अवस्था निर्माण होईल. ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकाविना होतील.

राज्यात मोफत शिक्षण घेणाऱ्या शहरी तथा ग्रामीण शेतकरी मुलांना शिक्षकाशिवाय शिक्षण घ्यावे लागेल. ही बाब त्यांना शिक्षणापासून वंचित करणारी असून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे, असा आरोप विज्युक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे यांनी केला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक असावेत, याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, उर्वरित वर्गाच्या परीक्षा मुल्यमापन व निकाल हे काम सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे यांना विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

परीक्षा कार्यात शिक्षक व्यस्त; समायोजन प्रक्रिया थांबवा

२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हास्तरावर समायोजनाची कार्यवाही ३ मार्चपर्यंत, तर २५ मार्चपर्यंत विभाग स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश संचालकांनी ४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात १० फेब्रुवारीपासून मंडळाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देखील सुरू आहेत. या सोबतच शिक्षकांना मंडळाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे लागेल.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.