Loading...
ब्रेकिंग न्यूज :
शिक्षक मृत्यू प्रकरणात फौजदार नागरगोजेला अटक पहिल्याच दिवशी उष्णतेचा कहर, झाडाखाली भरली शाळा खेराडे वांगी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात मिकी माऊसचे आकर्षण, पालकांचा कृतज्ञता सन्मान उंबरखडवा शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप मॉडेल स्कूल वांगणीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात बैलगाडीतून नवागतांची मिरवणूक जिल्हा परिषद शाळा मांगदरी येथे नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात जि.प. आदर्श केंद्र शाळा मेटगुताड येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न नगदवाडी शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त नवागतांचे उत्साहात स्वागत शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत सांगली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष पहिल्याच दिवशी १२,६५७ विद्यार्थी दाखल जि. प. शाळा मोहिते मळा येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात महागाई : बदलत्या काळातील नवे वास्तव खंदारेवस्ती मोडनिंब शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत स्वातंत्र्यसैनिक गुजर प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा जपत पाटण तालुका पुढे नेऊया : विजय पवार सांडगेवाडी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गणवेश, पाठ्यपुस्तके, खाऊ देऊन दरूज जि.प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात कथा वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजतात : किसन खोडदे देगावच्या धर्मवीर संभाजी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत गावभर शिक्षणाचा जल्लोष ! ढोरेगाव शाळा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हाकली नवागतांच्या स्वागताची बैलगाडी प्रेम संघर्षातूनच खरे जीवन उजळते... बांधावर मुरुम टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त शिक्षकाचा कुऱ्हाडीने खून रयतेचे ऋण कृतीतून फेडणारे लोकनेते म्हणजे रामशेठ ठाकूर - खा. शरद पवार गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न शिक्षक मृत्यू प्रकरणातील टोळीला मध्यरात्री अटक अन सकाळी जामीन कुरुंदवाडच्या पीएमश्री विद्यामंदिर क्र. ३ शाळेची प्रगती पाहन शिक्षण समितीचे सदस्य भारावले महाराष्ट्र समाज भूषण पुरस्काराने मुख्याध्यापक प्रदीप पवार यांचा गौरव १५ जूनला पुन्हा दुमदुमणार शाळेची घंटा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी राळेगणसिद्धी महामंडळ सभेला सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक नवलाई आली नवलाई आली मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारा सुसंस्कारक्षम कथासंग्रह - साद निसर्गाची शिक्षकांच्या संवेदनशीलतेची नवी दिशा अमरावतीत १४ गट शिक्षणाधिकाऱ्यांना 'सीईओं' ची कारणे दाखवा नोटीस वाकी मराठी शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनमुलवाड यांना साहित्यरत्न पुरस्कार आमणापूर विकास मंच चिंचवड मार्फत आमणापूर जि.प. शाळेत वह्या वाटप प्रवीण जोशींमुळे माणदेशी ओव्या साहित्यात अजरामर : महादेव जानकर ग्रीनलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना १० हजारांची मदत पर्यावरण दिनानिमित्त वनकुसवडे शाळेत वृक्षारोपण संपन्न पत्नी व मुलांची हत्या करून शिक्षकाची आत्महत्या जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू आयुष्याची 'एव्हरग्रीन' नायिका पेन्शन आदर्श शिक्षिका ते लेखिका एक सुंदर प्रवास रंजना सानप भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, शिक्षक ठरले देवदूत जि. प.शाळा इसवली सुतार पनोरेच्या मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' अभिनव उपक्रम
Satara,Maharashtra,India

शिक्षक मृत्यू प्रकरणात फौजदार नागरगोजेला अटक

शिक्षक मृत्यू प्रकरणात फौजदार नागरगोजेला अटक

छ. संभाजीनगर : वेरूळ येथील निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेत अखेर सहा दिवसानंतर वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आरोपी एकनाथ नागरगोजे एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बनगे या दोघांना तडकाफडकी सेवेतून निलंबित केले आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी मंगळवारी (दि. १६) आदेश काढले. विशेष म्हणजे, बोरसे कुटुंबीयांच्या जबाबानंतर दोघांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून उपनिरीक्षक नागरगोजे याला स्थानिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली.

 या आधी यातील काही आरोपींना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यांना किरकोळ कलमे लावल्यामुळे दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला होता.

वैजापूर ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी वेरूळ येथे आलेल्या तथाकथित वाळू माफियांच्या टोळक्याने आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांचा बुधवारी (दि. १०) रात्री मृत्यू झाला होता. या संतापजनक घटनेनंतर मोठे पडसाद उमटले. गावकऱ्यांनी रस्ता रोको केला. मंत्री, आमदार, विविध संघटना आक्रमक झाल्या. घटनेच्या दिवशी उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बनगे यांच्या उपस्थितीत सर्व प्रकार घडला.

घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसले. तरीही अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी टोळक्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबुराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२, सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) आणि सोपान अशोक चोथे (२७, रा. नालगाव, ता. वैजापूर) या चौघांना अटक केली मात्र, १२ तासात ते जामिनावर बाहेर आले. दुसरीकडे उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बनगे या दोघांवरही कारवाई केली नव्हती.


अधीक्षकांनी घेतली कुटुंबीयांची भेट

सोमवारी (दि. १५) स्वतः पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी बोरसे कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी बोरसे यांची पत्नी, मुलगी यांच्यासह या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी अशा ८ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सर्व घटनाक्रम बारकाईने समजून घेतल्यानंतर अधीक्षकांनी कुटुंबीयांना कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.


गुन्ह्यात किरकोळ कलमाची वाढ केली

कुटुंबीयांच्या सविस्तर जबाबावरून अखेर उपनिरीक्षक नागरगोजे याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. खुलताबाद पोलिस ठाण्यात शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणात सुरुवातीला बीएनएस कलम १०६ (१), १३१ अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आता तीन कलमे वाढली, मात्र तरीही या गंभीर कलमांचा अभाव दिसून येत आहे.

दरम्यान, माध्यमानी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून पहिल्या दिवशीपासून या दोन्ही पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागावर थेट प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनतर ही कारवाई झाल्याचे समोर आले.


गुन्ह्यात वाढ केलेली कलमे

कलम १२७ (२) : एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवल्यास १ वर्षापर्यंतच्या कारावासाची/५ हजार दंडाची शिक्षा होते.

कलम १९०: बेकायदेशीर जमावातील कोणत्याही एका सदस्याने समान उद्देशाने गुन्हेगारी कृत्य केल्यास, जमावातील प्रत्येक सदस्य त्या गुन्ह्यासाठी दोषी मानला जातो.

कलम १९८: लोकसेवकाने (सरकारी अधिकाऱ्याने) एखाद्या 3 व्यक्तीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची शिक्षा होते.

पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या अनुषंगाने दिलेल्या विभागीय चौकशीच्या आदेशानुसार एकनाथ नागरगोजे आणि वाल्मिक बनगे हे दोघेही दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे, तपासासाठी गेल्यानंतर स्थानिक पोलिसांची कोणतीही मदत न घेणे, ड्युटीवर असताना गणवेश परिधान न करणे. तपासासाठी खाजगी लोकांना सोबत घेऊन जाणे, असा गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.


कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही- एसपी जाधव 

या घटनेच्या अनुषंगाने अत्यंत सखोल तपास करण्यात येत आहे. विभागीय चौकशीत दोषी आढळल्याने उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार बनगे या दोघांना आज त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.