Loading...
ब्रेकिंग न्यूज :
नवलाई आली नवलाई आली मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारा सुसंस्कारक्षम कथासंग्रह - साद निसर्गाची शिक्षकांच्या संवेदनशीलतेची नवी दिशा अमरावतीत १४ गट शिक्षणाधिकाऱ्यांना 'सीईओं' ची कारणे दाखवा नोटीस वाकी मराठी शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनमुलवाड यांना साहित्यरत्न पुरस्कार आमणापूर विकास मंच चिंचवड मार्फत आमणापूर जि.प. शाळेत वह्या वाटप प्रवीण जोशींमुळे माणदेशी ओव्या साहित्यात अजरामर : महादेव जानकर ग्रीनलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना १० हजारांची मदत पर्यावरण दिनानिमित्त वनकुसवडे शाळेत वृक्षारोपण संपन्न पत्नी व मुलांची हत्या करून शिक्षकाची आत्महत्या जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू आयुष्याची 'एव्हरग्रीन' नायिका पेन्शन आदर्श शिक्षिका ते लेखिका एक सुंदर प्रवास रंजना सानप भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, शिक्षक ठरले देवदूत जि. प.शाळा इसवली सुतार पनोरेच्या मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' अभिनव उपक्रम विदर्भातील शाळांची घंटा ३० जूनला वाजणार मुख्यालयी निवासस्थाने द्या, अन्यथा मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य सरचिटणीसपदी किशनराव इदगे यांची निवड शिक्षकांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेऊ : पोपटराव पवार गावाकडची जत्रा जिल्हा परिषद शाळांतील पावसाळी सुट्टी - फायदे, तोटे आणि वास्तव... अतिरिक्त पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेस स्थगिती देण्याची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी जनगणना ड्युटीवर शिक्षकांचा मृत्यू झाल्यास एक कोटी मदतीची संघटनेची मागणी प्रा. रामचंद्र यादव यांना राज्यस्तरीय छ. शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार हवेली पत्रकार व वनराई देवराई संस्थेकडून सचिन बेंडभर यांचा विशेष सत्कार सेवाजेष्ठ टीईटी शिक्षकांच्या पदोन्नतीतील समावेशासाठी पूर्ण सहकार्य : दादा भुसे युवराज कांदेकर यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय : दीपक रोकडे मनोहर आंधळे यांच्या कवितेचा चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश टीईटी रद्दसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य शिक्षक संघाची भव्य महामंडळ सभा आजचे अधिकारी, कालचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पालकांनी जि.प. शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा काट्याची फुले करून मुंढरीची पंढरी साजरी करणाऱ्या ध्येयवेड्या गुरुजींचा खडतर जीवन प्रवास जि.प. शाळांत जादा तासांची धामधूम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळांची सुरुवात आता झाडे लावण्यापासून मुंबईतील ५७ मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर मालवणी, वऱ्हाडी बोलीभाषांचा पाठ्यपुस्तकात समावेश जि.प. शाळेत प्रवेशासाठी 'वासुदेवाची' साद राळेगणसिद्धीत शिक्षकांचा एल्गार, उद्या राज्यस्तरीय महामंडळ सभा, अण्णा हजारे, पोपटराव पवार करणार मार्गदर्शन दिनेश फडतरे यांना राज्यस्तरीय साहित्य परिमल पुरस्कार जाहीर राज्य शिक्षक संघाची राळेगण सिद्धी येथे ११ जून रोजी महामंडळ सभा हा अधिक महिना येतो कुठून...? JAB WE MET -An Endearing Story telling शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा राबवा ढोरेगाव केंद्राच्या प्रमुखपदी राजेश हिवाळे यांची नियुक्ती डॉ. संजय जगताप लिखित पुस्तक 'घे भरारी' चे दिमाखदार प्रकाशन समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुंजवणे गावाची उच्चस्तरीय पाहणी जनगणना बळी थांबेनात जि.प. शिक्षकाचा मृत्यू जिल्ह्यातून शिक्षकांनी मोठ्या संख्येने राळेगणसिद्धी येथे जमावे : विनायकराव शिंदे
Pune,Maharashtra,India

कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची मागणी
कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

 पुणे : राज्यातील सेवाज्येष्ठ व कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले.

   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेतही टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.

   राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शासकीय व निमशासकीय शिक्षकांना टीईटी/सीटीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी व विषय शिक्षक पदांवरील पदोन्नतीसाठीही ही अट लागू करण्यात आली आहे.

   सध्या अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गांसाठी उत्तीर्णतेसाठी ५ टक्के गुणांची सवलत देण्यात येते (किमान ५५% गुण आवश्यक). तर माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व कुटुंबीयांसाठी १५ टक्के सवलत देऊन किमान ४५% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

   याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना त्यांच्या वयाचा, मानसिकतेचा व अभ्यासक्रमातील बदलांचा विचार करून १५ टक्के गुणांची सवलत देण्यात यावी, म्हणजेच टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.

   या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक भूमिका घेत उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.

   या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे, अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी, शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.