Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा
Nanded,Maharashtra,India

९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती?

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र
९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती?

नांदेड : माध्यमिक स्तरावरील (इयत्ता ९ ते १२वी) विशेष शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे का? याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे.

तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतनसमता आणि सेवा अटींबाबत यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित आदेश दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

इयत्ता ९ ते १२ (माध्यमिक स्तर) साठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का? १० जून २०२२ रोजी शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रातील भरती प्रक्रिया फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकेंडरी या सर्व स्तरांवर लागू होते का? २०१० नंतर केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेतली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनावणीदरम्यान एएसजी भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी, त्यात माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचाही समावेश टी ई टी अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच Rehabil-itation Council of India (RCI) चे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी २०२१ मधील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली होती.

अमिकस क्युरींची भूमिका

अमिकस क्युरी यांनी युक्तिवाद केला की २०२२ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांत ‘एज्युकेटर’ हा शब्द इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ साठी वापरण्यात आला आहे; मात्र ९ ते १२ साठी नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते, असे त्यांनी सूचित केले. विशेषतः सेवाशेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राटी शिक्षकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.


कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्देश

हस्तक्षेपकत्यांच्या वतीने वरिष्ठ वकील वीरराधवन यांनी सांगितले की २०२२ मधील न्यायालयीन आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांच्या वेतनसमता आणि सेवा अटीबाबत अद्याप कोणत्याही राज्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारांना एका महिन्याच्या आत हलफनामा सादर करून २१ जुलै २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच मार्च २०२५ मधील आदेशातही है निर्देश पुनरुच्चारित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी केंद्र सरकारकडून हलफनामा सादर झाल्यानतर होणार आहे.

कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक

त्यामध्ये इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ साठी टीईटी अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते; मात्र ९ ते १२ साठी तसा स्पष्ट उल्लेख नव्हता. यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, “जर मार्गदर्शक तत्त्वांत इयत्ता ९ व १० चा स्पष्ट उल्लेख नसेल, तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल? केवळ पत्राद्वारे नियम बदलता येणार नाहीत. त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.