Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

प्रचंड गर्मीमुळे शाळांना सुट्टी ! तापमानात मोठी वाढ

विदर्भात उच्चांक, वर्ध्यात शाळा बंद
प्रचंड गर्मीमुळे शाळांना सुट्टी ! तापमानात मोठी वाढ

 नागपूर : मागील 48 तासांमध्ये राज्यात कुठंही पावसाची हजेरी नसून, उलटपक्षी उकाडा वाढल्याचं चित्र आहे. विदर्भातील अकोल्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.

तर, अमरावततीही पारा 44 अंशांवर पोहोचल्यानं आता हा आकडा हाफ सेंच्युरिपर्यंत जातोय का? हीच भीती व्यक्त केली जाच आहे. दरम्यान, उकाडा प्रचंड वाढत असल्याच्या धर्तीवर 16 एप्रिल 2026 रोजी वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि मध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान तापमान 43 ते 45 अंशांदरम्यान असून उष्माघाताचा धोका वाढल्यानं प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे.

शाळांना सुट्टी ...

वर्ध्यातील ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरु शकते. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना एप्रिल रोजी सुटी जाहिर केली. हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार जिल्ह्यात 15 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट देण्यात आला होता. शिवाय वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासुन वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तिव्रता वाढली असून अशा परिस्थितीत उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, राज्यातील इतर जिल्हे आणि शहरांमध्येसुद्धा उष्णतेची तीव्रता पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. गरज नसल्यास घरातच थांबण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला असून, यादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विदर्भात होरपळ सुरू झालेली असतानाच कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट असेल असा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पारा चाळीशीपार गेला आहे. राज्यात उष्ण वाऱ्यांची स्थिती पाहता सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि वर्धा इथं उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावतील असा इशारा जारी करण्यात आला आहे.

देशात रातोरात भयंकर हवामान बदल...

IMD च्या माहितीनुसार उत्तर भारतातही मागील 3 दिवसांपासून एकाएकी उकाडा वाला असून, सकाळपासूनच तीव्र सूर्यकिरणांमुळं अंगाची काहिली होताना दिसत आहे. अशा स्थितीत अतिशय महत्त्वाचा अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसम स्थिती असून, याचा फटका मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशाला बसणार आहे. तर, दक्षिण भारतात हवामान अंशत: ढगाळ आणि दमट असेल. पूर्वोत्तर भारतात पावसाचं सत्र सुरूच राहणार आहे, ज्यामुळं तापमान नियंत्रणात राहील.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी कमी तीव्रतेचा एक पश्चिमी झंझावात हिमालय क्षेत्रात प्रवेश करत आहे. ज्यामुळं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांत हलका पाऊस, हिमवर्षावाची शक्यता आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.