Loading...
ब्रेकिंग न्यूज :
टीईटीचा 'तो' निकाल रद्दच; मात्र उमेदवारांवरील परीक्षा बंदी उठवली राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम
Satara,Maharashtra,India

मुलांसोबत धावती कार थेट नदीपात्रात, जि. प. शिक्षकाने आयुष्य संपवलं

वरिष्ठांच्या त्रासाचे व्हाट्सअप स्टेट्स
मुलांसोबत धावती कार थेट नदीपात्रात, जि. प. शिक्षकाने आयुष्य संपवलं

नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड शहरालगत असलेल्या आमदुरा पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ही मन हेलावणारी घटना घडली.

आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअपला स्टेटस

धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी शिक्षकाने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. गट शिक्षण अधिकाऱ्यांसह इतर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुलासह आत्महत्या करीत आहे, असं स्टेट्स ठेवलं. सुनील मोरे असं त्यांचं नाव आहे. शिक्षकानं मुलांसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोण आहेत सुनील मोरे?

मृतक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील टेंबर गावचे रहिवासी असून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षकपदी कार्यरत होते. मागील काही वर्षापासून ते पत्नी आणि दोन मुलांसह सांगवी गोपाळनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. आज सकाळी दोन्ही मुलांना कारमध्ये बसून 'शाळेत सोडतो' म्हणून घरून निघाले. सकाळी सात वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदीपात्रात गाडी टाकून चिमुकल्यांसह त्यांनी जीवनयात्रा संपवली.

दोन वर्षापासून हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखाकडून वेगवेगळ्या कारणांवरून चौकशी करण्यात आली, त्यांच्या या जाचाला कंटाळलो असल्याचं शिक्षकाने घटनेपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं. स्टेट्समध्ये अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

या घटनेनं शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे घटनेपूर्वी शिक्षकाने आपल्या एका सहकार्यासोबत फोनवर संभाषण देखील केलं. समोरील व्यक्तीने 'आपण सोबत लढा देऊ, कोणताही निर्णय घेऊ नका', अशी विनवणी केली.

 'अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत', असं सुनील मोरेंनी देखील संभाषणात म्हटलं आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.