Loading...
ब्रेकिंग न्यूज :
राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा
Satara,Maharashtra,India

शिक्षकांना मोठा दिलासा, माहिती, अहवाल आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याची मुभा

शिक्षकांना मोठा दिलासा, माहिती, अहवाल आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याची मुभा

पुणे : राज्यातील शिक्षकांची सतत वेगवेगवेगळ्या प्रकारची माहिती सादर करण्यातून आता सुटका होणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापकांना दैनंदिन तीन प्रकारच्या नोंदी करण्याव्यतिरिक्त अन्य माहिती, अहवाल केवळ आठवड्यातून एकदाच, म्हणजे शनिवारी वरिष्ठ कार्यालयांना सादर करावी लागणार आहे.

त्यामुळे आता शिक्षकांना शिकवण्यासाठी अधिक वेळ मिळून रोजची अशैक्षणिक कामे कमी होणार आहेत.

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या बाबत परिपत्रक प्रसिद्ध करून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, महापालिका प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी शाळा स्तरावरील समित्या कमी करण्यात आल्या. यूडायस, सरल प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात पीएम पोषण योजनेमध्ये नोंदवहीचे सुलभीकरण करण्यात आले. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाइन, ऑफलाइन स्वरुपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरही शाळांना माहिती द्यावी लागते. त्यात शिक्षकांच्या अध्ययन, अध्यापनाचा वेळ जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, बीड जिल्ह्यातील आष्टी, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यांतील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार या उपक्रमाची पथदर्शी स्वरुपात अंमलबजावणी करण्यात आली. या प्रयोगातून ९० टक्के शिक्षकांनी समाधान व्यक्त केले, तर ९६.६ टक्के शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाल्याचे नमूद केले.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्या समीक्षा केंद्रावर (व्हीएसके पोर्टल) विद्यार्थी उपस्थितीची नोंद, पोषण आहार दिलेल्या विद्यार्थी संख्येची पीएम पोषण संकेतस्थळावर नोंद, विद्यार्थी सुरक्षा, विधीमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित माहिती ही कामे वगळता अन्य प्रकारची माहिती, अहवाल आता मुख्याध्यापक, शिक्षकांना शनिवारीच देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अध्ययन- अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळू शकणार आहे.


तात्काळ माहितीची मागणी नाही

राज्य ते केंद्र स्तरावरील कोणाही अधिकाऱ्याने तत्काळ माहिती मिळावी, शनिवार व्यतिरिक्त अन्य दिवशी माहिती मिळावी या बाबतचा आग्रह धरू नये, तसेच माहिती मागवू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षकांना प्रशासकीय कामांपेक्षा अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागाचा हा निर्णय त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या अहवाल, सर्वेक्षणे आणि ऑनलाइन माहिती सादर करण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होत होता. शासनाने माहिती सादरीकरणासाठी शनिवार हा एकच दिवस निश्चित करून शिक्षकांवरील प्रशासकीय ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अध्यापन मिळेल, शिक्षकांना नियोजनबद्ध काम करता येईल आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडून येईल. हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हितासाठीही महत्त्वाचा आहे.


0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.