Chennai,Tamilnadu,India
टीईटी पासिंगसाठी 40% गुणांची आवश्यकता, तामिळनाडू सरकारचा निर्णय

चेन्नई : सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये परीक्षांची अंमलबजावणी सुरू आहे.
राज्यांकडून टीईटी उत्तीर्णतेसाठी गुणांचे वेगवेगळे निकष आढळून येत आहेत. तामिळनाडू सरकारने कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्णतेसाठी एससी (SC) व एसटी (ST) वर्गासाठी 40% गुणांची अट ठेवली आहे, म्हणजेच या वर्गातील उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 150 पैकी 60 गुण मिळणे आवश्यक आहे. ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी हीच अट 50% म्हणजे 75 गुण तर खुल्या (OPEN) वर्गासाठी 60% इतकी अट आहे. म्हणजे 90 गुण मिळवल्यास ते उमेदवार पात्र ठरतील. तामिळनाडूत उद्या पासून (दि. 18 फेब्रुवारी) टीईटी परीक्षेचे अर्ज भरता येणार असून दि. 4 जुलै 2026 रोजी परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच टीईटी परीक्षेचा निकाल लागला असून सीटीईटी परीक्षा देखील नुकतीच झाली आहे. टीईटीसाठी महाराष्ट्रात उत्तीर्णतेची टक्केवारी खुला वर्ग 60 टक्के म्हणजेच 90 गुण असून ओबीसी, एससी, एसटी या वर्गासाठी 55% म्हणजेच 82.5 गुणांची आवश्यकता आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.