ब्रेकिंग न्यूज :
हंपी : गतवैभवाची साक्ष देणारे साम्राज्य संघर्षाच्या वाटेवरून यशाच्या शिखराकडे - आशिषचा प्रेरणादायी प्रवास! उंबरखडवा जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करगणी जि. प. शाळा नं. २ येथे संविधान दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावेनगर येथे महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी कार्यक्रम राज्य केंद्रप्रमुख, अधिकारी महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी किरण घाडगे विज्ञानाच्या नव्या शोधांतूनच समाजक्रांती शक्य : प्रिया शिंदे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी केंद्रशाळेत पाणी बॉटलचे वाटप सातारा जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य शिक्षक गुणवंत पुरस्कार जाहीर अपशिंगे मिलिटरीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली साताऱ्याच्या आकाशातील ‘सूर्यकिरण’ची शौर्यगाथा आकस्मिक भेटीत सभापती सविता पवार भारावल्या! क्रांतिसूर्य : समतेच्या युगाचा महानायक महात्मा जोतिबा फुले... स्त्रीशिक्षणाचा क्रांतिसूर्य! महात्मा ज्योतिराव फुले भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि नवयुगाचे प्रणेते! महात्मा फुले... क्रांतीची व्याख्या बदलणारा महामानव! महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसाठीचे कार्य! गुलामगिरीचा इतिहास आणि मुक्तीचा जाहीरनामा गिरीजाबाई पाटील मराठी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा फलटणमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन भावेनगर शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन दुर्गम पालाना शाळेचा ओम तालुक्यात प्रथम बेलसरच्या कल्याणी पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा शिंदेवाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग मोहन पवार यांच्या कृतितून आनंददायी शिक्षण साहित्य शिराळा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड आराध्य माने बुद्धिबळ स्पर्धेत वाई तालुक्यात प्रथम एआय मुळे 2027 नववर्ष कोविड पेक्षाही धोकादायक! प्रयत्नातून यशाकडे – राजवीरची बेरीज-वजाबाकीतील प्रगती चिरंतन प्रीतीची भावार्थसाद: ‘विरहार्त शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार संजयकुमार वाळके यांना प्रदान गोकुळ-धावडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘कडूगाव टॅलेंट सर्च’ उपक्रम सभापती डॉ. जितेंद्र कदम यांचा अभिनव पुढाकार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात फलटणमध्ये २०० हून अधिक सहभागी संविधान दिनानिमित्त खानापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन अपशिंगे मिलिटरी शाळेत दीपोत्सवातून जवानांना अनोखी मानवंदना आमोंडी जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा पवारवाडी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ : भारतीय संविधान भारतीय संविधान : लोकशाहीचा आधारस्तंभ जागर संविधानाचा, सन्मान लोकशाहीचा! मोबाईलच्या आभासी जगापेक्षा पुस्तकांचे बोट धरून समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवा : डॉ. शोभा नाईक ऑनलाइन कामांविरोधात शिक्षकांचा मोठा पवित्रा बुद्धिबळ स्पर्धेत श्रद्धा येवले वाई तालुक्यात प्रथम पालघरात वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षण उत्साहात संपन्न शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनात सातारा जिल्हा राज्यात प्रथम तळेगाव ढमढेरे जि. प. शाळेच्या १३ विद्यार्थ्यांची इस्रोला भरारी सातारा तालुका ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाचे हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये दिमाखात उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षकांच्या पगार वाढीच्या आशा पल्लवित कौशल्याधिष्ठित शिक्षण शिक्षण सेवकांची मूक वेदना... जुने दिवस... जुनी शाळा... जुन्या आठवणी...
Satara,Maharashtra,India

शिक्षक विशाल भगत यांनी विहिरीत उडी घेत वाचवले ८० वर्षीय महिलेचे प्राण!

धाडसी कृतीतून माणुसकीचे दर्शन; शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाचे सर्वत्र कौतुक
शिक्षक विशाल भगत यांनी विहिरीत उडी घेत  वाचवले ८० वर्षीय महिलेचे प्राण!

सातारा : शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना विहिरीत बुडत असलेल्या ८० वर्षीय महिलेला वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेवाडी येथील शिक्षक विशाल युवराज भगत यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या धाडसी कृतीचे ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

गावाच्या मध्यभागी मंदिराजवळ असलेल्या विहिरीत विमल भगवंत लोहार (वय ८० वर्षे) या महिला बुडत असल्याचे भगत सरांच्या निदर्शनास आले. परिसरात आरडाओरडा सुरू होता. एका वयस्कर व्यक्तीकडून मदतीसाठी हाका दिल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भगत सरांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. स्वतःजवळील मोबाईल व गाडीची चावी एका वयस्कर व्यक्तीकडे सोपवून अंगावरील कपड्यांसह त्यांनी विहिरीत उडी घेतली. पोहत जाऊन त्यांनी महिलेला विहिरीच्या एका बाजूला आणले.

दरम्यान, ग्रामस्थ व महिलांनी बांबू आणि दोरीची व्यवस्था केली. श्री. भगत यांनी महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी योग्य पद्धतीने दोरीचा आधार देण्यास सांगितले. याच वेळी राहुल नावाच्या तरुणानेही विहिरीत उडी घेऊन मदत केली. ग्रामस्थांच्या सहकार्याने अखेर महिलेला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. संकटाच्या क्षणी दाखवलेले धाडस, प्रसंगावधान आणि सामाजिक बांधिलकी यामुळे भगत सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक

विशाल युवराज भगत हे मूळचे रुई-बाबीर, ता. इंदापूर, जि. पुणे येथील रहिवासी असून, २०१३ पासून ते सातारा जिल्ह्यात शैक्षणिक सेवा बजावत आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्याशी त्यांनी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. 'आपली शाळा, आपले गाव आणि आपले विद्यार्थी' या भावनेतून ते शाळेत सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतात.

शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्याची आवड असलेल्या श्री. भगत यांनी यापूर्वीही आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचविण्यासारख्या मदतीच्या कृती केल्या आहेत. तंत्रस्नेही शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख असून, विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि संस्कारांचे धडे देण्यावर त्यांचा भर असतो.


शैक्षणिक परिषद यशस्वी करण्यासाठीही महत्त्वाचे योगदान

ऑक्टोबर २०२६ मध्ये शेरेवाडी शाळेत आयोजित शैक्षणिक परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक  तात्यासो धनवडे आणि विशाल भगत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नियोजन, समन्वय आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून परिषद यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

भगत यांच्या या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे मुख्याध्यापक श्री. धनवडे, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे, विस्तार अधिकारी सुजाता जाधव आणि गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे यांनी कौतुक केले.

शिक्षकाचे खरे मोठेपण केवळ वर्गातील अध्यापनातून नव्हे, तर संकटाच्या वेळी समाजासाठी पुढे सरसावण्यातूनही दिसून येते. विशाल भगत यांच्या या कृतीतून शिक्षकाची सामाजिक जबाबदारी, माणुसकी आणि सेवाभाव यांचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर आला आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.