Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Kanpur,UP,India

'फील्डवर काम नको, तर माझ्या शेजारी एसीत बसून बॅटिंग करा'

कलेक्टर साहेबांच्या गुगलीने गुरुजी त्रिफळाचित! मग सटकले आणि क्षेत्ररक्षणास पळाले!
'फील्डवर काम नको, तर माझ्या शेजारी एसीत बसून बॅटिंग करा'

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात वर्ष 2027च्या डिजिटल जनगणनेची तयारी वेगाने सुरू आहे. प्रशासनाने यासाठी कर्मचारी आणि शिक्षकांच्या ड्युटी लावण्यास सुरुवात केली आहे, पण त्याचबरोबर ड्युटी रद्द करण्यासाठी नवनवीन कारणे सांगण्याचे सत्र सुरू झाले आहे.

बुधवारी (15 एप्रिल) कानपूर जिल्हाधिकारी कार्यालयात असाच एक प्रकार घडला, जिथे जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या एका आगळ्यावेगळ्या निर्णयाने एका शिक्षकाचा दृष्टिकोन बदलला, इतकंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासाठी एक आदर्श घालून दिला.

जनगणनेची ड्युटी रद्द करण्यासाठी डीएमकडे पोहोचले शिक्षक

जनता दर्शन कार्यक्रमादरम्यान जयप्रकाश शर्मा नावाचे एक साहाय्यक शिक्षक आपली जनगणनेची ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले. "मी शारीरिकदृष्ट्या अनफिट असून फील्डवर जाऊन काम करू शकत नाही," अशी माहिती त्यांनी दिली. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी चक्क दिव्यांग प्रमाणपत्रही दाखवले आणि या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.

 "माझ्या शेजारी बसा आणि लोकांच्या समस्या सोडवा", जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली गुगली

सहसा अशा अर्जांवर अधिकारी कडक शब्दात नकार देतात, पण जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी वेगळीच युक्ती लढवली. ते शिक्षकाला म्हणाले, "जर तुम्ही फील्डवर जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही इथेच माझ्या शेजारी बसा आणि जी जनता आपल्या समस्या घेऊन येत आहे, त्या ऐकून त्यांच्या समाधानासाठी मला मदत करा."

तक्रारींचा पाऊस पडताच गुरुजींना फुटला घाम!

जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकासाठी आपल्या शेजारीच खुर्ची टाकली. पुढच्याच क्षणी तक्रारदारांची रिघ लागली. कोणाचा जमिनीचा वाद होता, कोणाची पेन्शन रखडली होती, तर कोणी पोलिसांच्या त्रासाला कंटाळले होते. प्रत्येक तक्रारदार आपली समस्या मांडताना भावूक किंवा संतप्त होता. एकामागून एक येणाऱ्या तक्रारी आणि लोकांचा दबाव पाहून शिक्षक जयप्रकाश शर्मा यांची चांगलीच तारांबळ उडाली.

 30 मिनिटांतच शिक्षकाचे हृदयपरिवर्तन

अवघ्या 30 मिनिटांत जनसामान्यांच्या तक्रारींचा ओघ झेलताना शिक्षकाला घाम फुटला. त्यांना जाणवले की एसी ऑफिसमध्ये बसून शेकडो लोकांच्या समस्या सोडवणे हे फील्डवर जाऊन जनगणना करण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मानसिक तणावाचे काम आहे. शिक्षक तातडीने खुर्चीवरून उठले आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, "साहेब, एकाच वेळी इतक्या समस्या ऐकणे आणि त्यांचे निराकरण करणे अत्यंत कठीण काम आहे. मला आता जनगणनेची ड्युटी करण्यास काहीच हरकत नाही, मी ती जबाबदारी चोख पार पाडीन."

सोशल मीडियावर डीएमच्या स्टाइलची चर्चा

जिल्हाधिकाऱ्यांच्या या 'लाइव्ह टेस्ट'चा परिणाम असा झाला की, ड्युटी रद्द करण्यासाठी रांगेत उभे असलेले इतर कर्मचारी आपले अर्ज खिशात घालून तिथून गुपचूप निघून गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही कठोर शब्दाचा वापर न करता, जबाबदारीची जाणीव करून दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.