Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट

टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी अनिवार्य टीईटी  उत्तीर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता शिक्षकांना ही परीक्षा पास करण्यासाठी नवीन वाढीव मुदत मिळाली आहे.

शिक्षकांना आता 31 ऑगस्ट, 2028 रोजीपर्यंत ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करता येईल. सर्वोच्च न्यायालायने गुरूजींना टीईटीमधून सवलत, सूट देण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षकांना आता ही परीक्षा टाळण्यासाठी कोणतेच कारण पुढे करता येणार नाही. अनेक शिक्षक संघटनांचा या परीक्षेला विरोध होता.

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांहून अधिकची मुदत

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आणि टीईटीतून सवलत देण्याची शिक्षकांची विनंती फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे देशभरातील लाखो शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी दोन वर्षांहून अधिकचा कालावधी मिळेल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी हा मोठा कालावधी मानला जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या नवीन आदेशानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट 2027 ही मुदत होती. ती वाढवून आता 31 ऑगस्ट, 2028 रोजी अशी करण्यात आली आहे. शिक्षकांना दोन वर्षांहून अधिकचा कालावधी या परीक्षेसाठी मिळेल. त्यात त्यांना संधी मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर दाखल अनेक पुनर्विचार याचिकांवर सुनावणी झाली. तेव्हा हा न्यायालायने हा आदेश दिला.

सरकारी आणि अनुदानित खासगी शाळांवरील इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शिक्षकांना नियुक्तीसाठी गेल्या काही वर्षांपासून टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. जे शिक्षक इतक्या प्रयत्नाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्या गुरुजींना आता दोन वर्षांच्या कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य झाले आहे.

‘सुप्रीम’ आदेश काय?

देशभरातील शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळम, पश्चिम बंगालसह इतर राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी आणि काही राज्य सरकारांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

जे शिक्षक सध्या सेवेत आहेत. तसेच ज्यांची नियुक्ती ही राईट टू एज्युकेशन कायदा, 2009 लागू होण्यापूर्वी करण्यात आली होती. त्यांना टीईटी परीक्षेतून सवलत, सूट देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

पण सुप्रीम कोर्टाने TET मधून सवलत, सूट देण्यास स्पष्ट नकार दिला. तर ही परीक्षा देण्यास मुदतवाढ दिली.

जे शिक्षक गैर-अल्पसंख्याक शाळांमध्ये काम करत आहेत. त्यांना सध्या देण्यात आलेल्या मुदतवाढीतच ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.