Loading...
ब्रेकिंग न्यूज :
टीईटीचा 'तो' निकाल रद्दच; मात्र उमेदवारांवरील परीक्षा बंदी उठवली राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम
Satara,Maharashtra,India

जि.प.शाळेच्या विद्यार्थिनीला चिरडले

जि.प.शाळेच्या विद्यार्थिनीला चिरडले

पालघर, मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गुरूवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने भरधाव वेगाने गेलेल्या इको कारने सोनम युवराज खरपडे हिला जोरदार धडक दिली. या घटनेमुळे आडोशी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनम युवराज खरपडे (वय १२) ही आडोशी येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती.

सकाळी सुमारे ९.४५ वाजता सोनम शाळेत जात असताना शाळेच्या पटांगणात पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको कार (क्र. MH 14 MC 7943) उभी होती. त्याच गावातील शंकर किसन घाटाळ (वय ३६) याने वाहनचालकाकडून चावी घेऊन कार सुरू केली.

कार सुरू करताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कार भरधाव वेगाने शाळेच्या आवारात खेळत असलेल्या तसेच शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने गेली. इतर मुलींनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतली; मात्र सोनमला बाजूला होण्याची संधी न मिळाल्याने कारने तिला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात सोनमच्या छातीसह डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतींमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सोनमचे वडील युवराज विलास खरपडे (वय ३२, व्यवसाय - मजुरी) यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनास्थळी पाहणी केली.

मोखाडा पोलीस ठाण्याचे सपोनि अजित साबळे आणि उपनिरीक्षक प्रतिक पोकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास प्रतिक पोकळे करीत आहेत. 


शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुरक्षिततेचा, विशेषतः शाळांना संरक्षण भिंत अर्थात कंपाऊंड वॉल नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आडोशी येथील शाळेलाही संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीकडून यापूर्वीही कंपाऊंड वॉल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मातेकर यांनी आडोशी येथे भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी शाळेच्या कंपाऊंड वॉलचा प्रस्ताव VB-G RAM G - विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी (ग्रामीण) योजनेतून तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सोनमच्या कुटुंबीयांना राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.