Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

गॅस पायी शिक्षक 'गॅस' वर

गॅस पायी शिक्षक 'गॅस' वर

सातारा : एकीकडे शिक्षणाचे धडे गिरवायचे की गॅस एजन्सीचे उंबरठे झिजवायचे? असा संतप्त सवाल आता शिक्षक विचारू लागले आहेत. एप्रिलच्या रखरखत्या उन्हात शाळा सकाळच्या झाल्या असल्या, तरी शिक्षकांचा दुपारचा वेळ मात्र गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीच्या रांगेत आणि 'ऑनलाईन'च्या चक्रव्यूहात जात आहे. प्रशासनाच्या निकामी ऑनलाईन यंत्रणेमुळे वैतागलेल्या एका शिक्षकाने तर "साहेब, काडी लावा त्या सिलेंडरला!" अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडाभरापासून अनेक शिक्षक गॅस मिळवण्यासाठी धडपडत आहेत. पण एजन्सीने मांडलेला 'ऑनलाईन' चा खेळ संपता संपत नाहीये. पहिल्या दिवशी मोबाईल लिंक करा, दुसऱ्या दिवशी २४ तास थांबा, तिसऱ्या दिवशी ओटीपीची वाट पहा आणि चौथ्या दिवशी मुख्याध्यापकांचे पत्र आणा... अशा एकामागून एक अटींच्या जाळ्यात शिक्षकांना अडकवण्यात आले आहे. ही गॅस एजन्सी आहे की कागदपत्रे तपासणीचे एखादे शासकीय कार्यालय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एजन्सीच्या नवीन पोर्टलचा गोंधळ इतका आहे की, सात-सात दिवस होऊनही 'लिमिट सेट नाही' किंवा 'ओटीपी येत नाही' हीच उत्तरे मिळत आहेत. त्यात भर म्हणून एजन्सीतील कर्मचारी फोन उचलत नाहीत आणि विचारणा केली तर "आम्ही फोन घेऊन वैतागलोय" अशी उद्धट उत्तरे दिली जात आहेत. मुळात ही ऑनलाईन सक्ती सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिक्षकांच्या सोयीसाठी आहे की त्यांना छळण्यासाठी? याचा जाब आता विचारला जात आहे.


सिलेंडर शिक्षणाचा लोच्या केला 

या गोंधळाचा परिणाम केवळ शैक्षणिक कामावरच होत नाही, तर शिक्षकांच्या कौटुंबिक शांततेवरही झाला आहे. शाळेची वेळ संपल्यानंतर रोज दोन-दोन तास एजन्सीत घालवावे लागत असल्याने "शाळा सुटल्यावर नक्की कुठे जाता?" असा संशयी प्रश्न घरच्यांकडून विचारला जात आहे. एकीकडे जनगणना, निकाल पत्रके आणि शैक्षणिक कामांचा डोंगर समोर असताना, गॅससाठी होणारी ही फरफट शिक्षकांच्या संयमाचा अंत पाहत आहे.


गॅससाठी खेळ मांडीयला 

ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटींमुळे जर एखाद्या सुशिक्षित वर्गाची ही अवस्था होत असेल, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे काय,  असा सवाल नागरिक करत आहेत. संबंधित विभागाने या तांत्रिक अडचणींची तातडीने दखल घेऊन हा गुरुजी आणि वितरकांचा 'गॅससाठी खेळ' थांबवावा, अन्यथा शिक्षकां बरोबर पालक ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.