Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जनगणनाः प्रगतीचा आरसा की अपयशाचा लेखाजोखा ? के. ए. संकपाळ यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य उल्लेखनीय : सुरेश शिंदे करगणी नं. २ शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष मालदरावस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप एस.आर. दळवी संस्थेच्या राज्य अध्यक्षपदी रमेश माने नितीन मेमाणे यांची राज्य सचिवपदी निवड जि.प. प्राथमिक केंद्र शाळा भणंग येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत दत्तनगर शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरुवात दरुज येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणुकीद्वारे मंत्रिमंडळाची स्थापना शिनोलीत उद्या १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संभाजीनगर जि.प. आदर्श शाळेत सुंदर हस्ताक्षर पुस्तकांचे वितरण शिक्षकांना मोठा दिलासा, माहिती, अहवाल आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याची मुभा आठवणींच्या हिंदोळ्यावर सुट्टी संपली.. घंटा झाली.. शाळेची ओढ लागली.. जि. प. प्राथमिक शाळा भावेनगर येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न सालपे शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत सुभाषनगर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात, आमदार महेश शिंदे यांच्याकडून नव्या बोअरवेलची घोषणा राजेंद्र विद्यालयात मोफत पुस्तक वाटपासह नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत भाटशिरपुरा जि.प. शाळेत नवागतांची बैलगाडीतून दिमाखदार मिरवणूक निढळ जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली प्रवेशोत्सव उत्साहात जगतापवाडी शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत ट्रॅक्टर मिरवणूक, रोपवाटपाने प्रवेशोत्सव रंगला कोडोली केंद्र शाळेचा प्रवेशोत्सव जल्लोषात नवागतांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक पन्हाळ्याच्या खोतवाडी विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत चितळी जिल्हा परिषद केंद्रसमुहात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा कोकणातील शिक्षिका अद्याप बेपत्ता झेंडावंदनानंतर झाल्या होत्या गायब शिक्षक मृत्यू प्रकरणात फौजदार नागरगोजेला अटक पहिल्याच दिवशी उष्णतेचा कहर, झाडाखाली भरली शाळा खेराडे वांगी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात मिकी माऊसचे आकर्षण, पालकांचा कृतज्ञता सन्मान उंबरखडवा शाळेत नवागतांचे जल्लोषात स्वागत मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप मॉडेल स्कूल वांगणीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात बैलगाडीतून नवागतांची मिरवणूक जिल्हा परिषद शाळा मांगदरी येथे नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात जि.प. आदर्श केंद्र शाळा मेटगुताड येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न नगदवाडी शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त नवागतांचे उत्साहात स्वागत शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत सांगली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष पहिल्याच दिवशी १२,६५७ विद्यार्थी दाखल जि. प. शाळा मोहिते मळा येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात महागाई : बदलत्या काळातील नवे वास्तव खंदारेवस्ती मोडनिंब शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत स्वातंत्र्यसैनिक गुजर प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा जपत पाटण तालुका पुढे नेऊया : विजय पवार सांडगेवाडी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गणवेश, पाठ्यपुस्तके, खाऊ देऊन दरूज जि.प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात कथा वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजतात : किसन खोडदे देगावच्या धर्मवीर संभाजी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत गावभर शिक्षणाचा जल्लोष ! ढोरेगाव शाळा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हाकली नवागतांच्या स्वागताची बैलगाडी प्रेम संघर्षातूनच खरे जीवन उजळते... बांधावर मुरुम टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त शिक्षकाचा कुऱ्हाडीने खून रयतेचे ऋण कृतीतून फेडणारे लोकनेते म्हणजे रामशेठ ठाकूर - खा. शरद पवार गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न
Satara,Maharashtra,India

शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक

फौजदार एकनाथ नागरगोजे मात्र मोकाट
शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक

छ. संभाजीनगर : वेरूळ येथील शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यापैकी एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगण्यात आले. वाळूमाफियांची गँग सोबत घेऊन आरोपीला शोधण्याची नौटंकी करून पोलीस खात्याच्या अब्रुची लक्तरे काढणारे फौजदार एकनाथ नागरगोजे मात्र आपल्याच खात्याच्या मेहेरबानीने मोकाट आहेत. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून वाद आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी रवींद्र आवारे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात तीन जणांविरूद्ध दाखल करण्यात आला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता. संदीप हा वेरूळ येथे नातलगाकडे लपला असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यावरून मध्यरात्री फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे हे खासगी गाडीतून वेरूळ येथे आले. विशेष म्हणजे फिर्यादी रवींद्र आवारेही आपल्या गँगला सोबत घेऊन पोलिसांसोबत आला.अचानक पोलीस घरात घुसल्यामुळे एकच गोंधळ उडाला, हे पाहून तेथून जाणारे सुरेश बोरसे यांनी पोलिसांना हटकले. बोरसे यांनी हटकताच पोलीस आणि वाळूमाफियांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला.

शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, तालुकाप्रमुख राजू वरकड, शहरप्रमुख मुकेश मालोदे यांच्या नेतृत्वाखाली पाच तास रास्ता रोको करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. सुरेश बोरसे यांची पत्नी अनिता यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. आज या प्रकरणात रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबुराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२), सोपान अशोक चोथे (२७) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला आरोपी तसेच वाळूमाफिया रवींद्र आवारे याला पेढा भरवतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या छायाचित्राने वैजापूर पोलीस आणि वाळूमाफियांचे संबंध किती मधुर आहेत, हे जगासमोर आले. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे यांनी पोलीस खात्याची अब्रु धुळीला मिळवली आहे. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी या बेशिस्त, बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरगोजे, बनगेवर कारवाई का नाही?

पोलीस खात्याच्या सर्व नियमांचा लिलाव करून आरोपीच्या शोधासाठी फिर्यादीला घेऊन जाणारे फौजदार एकनाथ नागरगोजे आणि त्यांच्यासोबत असलेले कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे हे दोघेही आपल्याच खात्याच्या मेहेरबानीने मोकाट फिरत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेरूळला जात असल्याची नोंद ठाणे डायरीत करण्यात आली नाही, तेथील स्थानिक पोलिसांना कल्पना देण्यात आली नाही. पोलिसांच्या गाडीत हे पथक गेले नाही, तर वाळूमाफियाच्या गाडीत गेले. मुळात सुरेश बोरसे यांना कोणत्या अधिकारात पोलिसांनी मारहाण केली? बोरसे यांच्या मुलीने गाडी अडवली नसती तर पोलीस आणि वाळूमाफियांनी तेथेच त्यांचा जीव घेतला असता. पोलीस खात्याच्या अब्रुचे धिंडवडे निघत असतानाही नागरगोजे आणि बनगे या दोघांवरही किरकोळ कारवाईचा साधा ओरखडाही उठला नाही.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.