Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

सरकारी शाळांमध्ये सर्वोच्च प्रतिबंध

विनापरवानगी 'बाहेरच्या' प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सरकारी शाळांमध्ये सर्वोच्च प्रतिबंध

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार, यूट्यूबर्स, सोशल मीडिया चालविणारे तसेच समाजातील प्रतिनिधींना विनापरवानगी प्रवेश देण्यास शिक्षण विभागाने घातलेल्या निर्बंधांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सरकारी शाळांच्या परिसरात प्रवेश करणे, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, मुलाखत, ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा लाइव्ह स्ट्रिमिंग करणे शक्य होणार नाही.

 या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम अभिजीत दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानावर होण्याची शक्यता आहे.

स्कूल ठीक करो, अभियाना दरम्यान शाळांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. लखनऊमधील एका शाळेत एका यूट्यूबरने परवानगीशिवाय प्रवेश केल्याचे आणि शिक्षकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते. त्यानंतर सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश द्यायचा की नाही, यावर वाद निर्माण झाला होता. अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीकडून 'स्कूल ठीक करो' अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत सीजेपीचे कार्यकर्ते विविध शाळांमध्ये जाऊन तेथील त्रुटींची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करत होते.

या वादाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये विनापरवानगी प्रवेश तसेच कोणत्याही प्रकारचे शूटिंग आणि फोटोग्राफी करण्यास निर्बंध घातले. या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारांचे हे निर्बंध संविधानाच्या अनुच्छेद १४, १९, २१ आणि २१-अ अंतर्गत नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचा दावा केला होता. शाळांमधील परिस्थितीचे स्वतंत्रपणे दस्तऐवजीकरण केल्यास तेथील मूलभूत सुविधांमधील त्रुटी समोर येऊ शकतात, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला होता. शाळांमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, मध्यान्ह भोजन यांसारख्या सुविधांची प्रत्यक्ष परिस्थिती अशा प्रकारच्या दस्तऐवजीकरणातून उघड होऊ शकते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. राजस्थानच्या शिक्षण विभागाने १६ ऑगस्ट २०२६ रोजी, तर उत्तर प्रदेशने १९ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित आदेश जारी करून शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय शाळेच्या परिसरात प्रवेश, फोटोग्राफी, मुलाखत आणि लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यावर निर्बंध घातले होते.


अनुच्छेद ३२ अंतर्गत सुनावणीस इच्छुक नाही

न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने मंगळवारी या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत ती फेटाळून लावली. "आम्ही अनुच्छेद ३२ अंतर्गत या याचिकेवर सुनावणी करण्यास इच्छुक नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केलेल्या या याचिकेत राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या परिपत्रकांना आव्हान देण्यात आले होते. या परिपत्रकांनुसार बाहेरील व्यक्तींना शाळेत विनापरवानगी प्रवेश करण्यास तसेच व्हिडीओग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या स्तरावरची याचिका ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्यांनी विनापरवानगी शाळांमध्ये प्रवेश रोखण्यासाठी जारी केलेले आदेश कायम राहणार आहेत.


दिपके यांच्या अभियानाला धक्का

या याचिकेचा अभिजीत दिपके किंवा त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीशी थेट संबंध नसला, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानाला मोठा धक्का बसला आहे. अभियानाच्या माध्यमातून दिपके आणि त्यांचे सहकारी विविध सरकारी शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील त्रुटींची पाहणी आणि दस्तऐवजीकरण करत होते. मात्र, आता संबंधित शाळा किंवा शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना शाळांमध्ये थेट प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे या अभियानाची पुढील दिशा आणि त्याच्या कार्यपद्धतीवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.