Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा
Pune,Maharashtra,India

जि. प. शाळा बसला अपघात 14 विद्यार्थी 4 शिक्षक जखमी

नेवासातील ५३ विद्यार्थ्यांची सहल, कल्याण - नगर रस्त्यावर अपघात
जि. प. शाळा बसला अपघात 14 विद्यार्थी 4 शिक्षक जखमी

पुणे, ओतूर : कल्याण - नगर रोडवर गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. पिंपरी शाहाली ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथून सहलीसाठी निघालेली जिल्हा परिषद शाळेची मुलांनी भरलेली एसटी बस डुंबरवाडी हद्दीत टोल नाक्यापासून आळेफाटा दिशेला सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देऊन पलटी झाली. या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नेवासा येथील शाळेतील ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी ओझर लेण्याद्री च्या दिशेने निघाली होती. बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी असा मोठा ताफा होता. नगर- कल्याण महामार्गावरून प्रवास सुरू असताना डुंबरवाडी परिसरात चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढील टायर फुटला आणि काही क्षणांतच वाहन पलटी झाले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात मोठा आवाज झाला. बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. 

जखमीची नावे, श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धांत मुसळे, सार्थक कोकाटे, जिया शेख, ईश्वरी लहारे, सागर फावले, अनुराज काळे, रितेश मोरे, स्नेहल खंडागळे, शुभम गोंडुळे, पायल कचरे, काव्या गोसावी, आयर्न नवथर अपघातात विद्यार्थ्यांच्या हातपायाला मार लागला आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ, शिक्षक व प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयात सर्व जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या अपघातामुळे कल्याण नगर रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.