Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Sindhudurg,Maharashtra,India

जि. प शिक्षिका झेंडावंदन करून अचानक बेपत्ता

कोल्हापूरमध्ये 8 वर्षांचा मुलगा बघतोय आईची वाट
जि. प शिक्षिका झेंडावंदन करून अचानक बेपत्ता

सिंधुदुर्ग : कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली पूजा अनिल पोवार या शिक्षिका सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात कामानिमित्त राहत होत्या. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी त्या गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः पती अनिल पोवार आणि 8 वर्षांचा मुलगा मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत.

पूजा पोवार वैभववाडीतील जिल्हा परिषद शाळा, सोनाळी चव्हाणवाडी येथे सेवेत होत्या. नेहमीप्रमाणे त्या 1 मे रोजी शाळेत कार्यक्रमासाठी गेल्या, मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत.

सुरुवातीला उशीर झाला असेल असे समजून कुटुंबीयांनी प्रतीक्षा केली, पण बराच वेळ उलटूनही त्यांचा काहीच संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांच्या पतीने स्वतःहून शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईक, मित्रमंडळी आणि ओळखीच्या सर्व ठिकाणी चौकशी करूनही कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

शेवटी 2 मे रोजी अनिल पोवार यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. पोलिसांना एका संबंधित व्यक्तीचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेत काही संशयास्पद बाबी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात पोलिसांनी फोटो शेअर करत नागरिकांना आवाहन केले आहे की, पूजा पोवार यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांशी व नातेवाईकांशी सतत संपर्क ठेवून अधिक माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


पूजा पोवार यांचा जीवनप्रवासही प्रेरणादायी

लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांनी आईच्या आधारावर शिक्षण पूर्ण केले. डीएड केल्यानंतर व लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि एमपीएससीद्वारे अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने केवळ कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण परिसरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.