Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

9 शिक्षकांचा दुर्दैवी शेवट, सहल जीवावर बेतली

व्हॅन बॅरियरला धडकून दरीत कोसळली,शाळेवर शोककळा
9 शिक्षकांचा दुर्दैवी शेवट, सहल जीवावर बेतली

चेन्नई: तमिळनाडूतील वालपराईत पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केरळमधील एका शाळेचे शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा ग्रुप कुटुंबियांसह पर्यटनासाठी तामिळनाडूला गेला होता. त्यांनी आधी अथिरापल्लीचा धबधबा पाहिला. यानंतर ते वालपराईला रवाना झाले होते. याच दरम्यान त्यांच्या व्हॅनला अपघात झाला. कोईम्बतूर जिल्ह्यात असलेल्या वेलपराईच्या डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. व्हॅनमधील सगळे जण केरळच्या मल्लपुरम भागाचे रहिवासी आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपराई-पोल्लाची हिल रोडजवळ एका वळणावर चालकाचं व्हॅनवरील नियंत्रण सुटलं. व्हॅननं आधी बॅरियरला धडक दिली. मग ती खोल दरीत कोसळली. अपघात अतिशय भीषण होता. या अपघातात व्हॅनचा अक्षरश: चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकानं रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या अपघातात चालकासह अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.

 अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दुर्घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. दरीतून शव बाहेर काढण्यात आले. जखमींना पोल्लाची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. व्हॅनमधील काही प्रवासी मलप्पुरमच्या शाळेत अध्यापनाचं काम करायचे. शाळेला सुट्टी असल्यानं ते तामिळनाडूला फिरायला गेले होते.

 अपघाताबद्दल समजताच शाळेत पालकांची आणि स्थानिकांची गर्दी जमली. एकूण १६ जण फिरायला गेल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात केरलम पोलीस तमिळनाडू पोलिसांच्या संपर्कात आहेत. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. जखमींना लवकर आराम पडवा यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

 केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'हा अपघात अतिशय दु:खद आहे. जखमींना योग्य उपचार दिले आहेत,' अशी माहिती विजयन यांनी दिली.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.