Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Nasik,Maharashtra,India

नाशिक महानगर पालिका शाळेतील विद्यार्थी 11 हजारांनी घटले

आहे त्या शाळा बंद करून त्याचा इतर कामांसाठी वापर, शिक्षणमंत्री दादा भुसेंना काळजी लागली
नाशिक महानगर पालिका शाळेतील विद्यार्थी 11 हजारांनी घटले

नाशिक : महापालिकेच्या शाळांची पटसंख्या ४० हजारांवरून २९ हजारांपर्यंत खाली येणे, ही भूषणावह बाब नाही. शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी, अशा कानपिचक्या राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी नवीन शाळा, वर्ग प्रस्तावांवर जलदगतीने निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले.

नाशिक महापालिका शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी, भुसे यांनी मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली, त्यांच्याशी संवाद साधला. प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी मनपा शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सभागृहाला संबोधित करताना शिक्षणमंत्री भुसे यांनी नाशिक महापालिका, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे नाराजी प्रगट केली. शाळा ही ज्ञानाची मंदिरे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण मंदिरांच्या विकासासाठी पुढाकार घेतो, तसेच शाळांचा विकास करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. मनपा शाळांभोवती अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्व अतिक्रमणे हटवावीत, असे भुसे यांनी निर्देश दिले. नाशिक महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ११ हजारांनी घटलेल्या पटसंख्येवर त्यांनी बोट ठेवले. आगामी काळात ही पटसंख्या पुन्हा ४० हजारांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सूचित केले. याप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक आदी उपस्थित होते.

नवीन शाळा, वाढीव वर्ग प्रस्ताव

मंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील यशस्वी शालेय उपक्रमांची चित्रफित दाखवून नाशिकमध्येही त्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. राज्याचा आढावा घेताना आपले स्वतःचे घर म्हणजेच नाशिक सुस्थितीत असणे आवश्यक आहे. शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी. उलट, येणाऱ्या काळात नगरसेवकांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढीव वर्गांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना एका तासाच्या आत मंजुरी दिली जाईल. पुण्याच्या गर्दरेवाडी येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी ज्याप्रमाणे शाळेचे चित्र बदलले, तसेच प्रयत्न नाशिकमध्येही व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात कपात

शिक्षकांच्या २५ टक्के अशैक्षणिक कामांमध्ये कपात करण्यात आली असून उर्वरित कामांबाबतही शासन विचार करत असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. पदोन्नती प्रक्रिया राबवून पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देणे, तारांगण प्रकल्पाचा पूर्ण वापर करणे आणि एकल पालक योजनेचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यावर त्यांनी भर दिला. शिक्षण विभागाने बेकायदेशीर बाबी आणि शालेय पोषण आहाराबाबत अत्यंत सतर्क राहून वेळोवेळी शाळा भेटी आयोजित कराव्यात, असेही त्यांनी बजावले.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.