Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

१४२ शिक्षकांचा जनगणनेच्या कामास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडून हकालपट्टीची शिफारस

१४२  शिक्षकांचा जनगणनेच्या कामास नकार,  जिल्हाधिकाऱ्यांकडून हकालपट्टीची शिफारस

दिल्ली : दिल्लीमधील शिक्षकांनी जनगणनेचे काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे वार्षिक करारावर असलेल्या 142 अतिथी (गेस्ट) शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. जनगणनेच्या कामावर जाण्यासाठी नकार देणाऱ्या शिक्षकांची तात्काळ हकालपट्टी करण्याची शिफारस जुन्या दिल्लीमधील जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांना पत्र लिहून केली आहे.

16 एप्रिलला शिक्षकांना एका पत्राच्या माध्यमातून जनगणनेचे काम करणे हे अत्यावश्यक आहे, असे सांगण्यात आले होते. शिवाय या पत्रातून असेही म्हटले होते की, सहकार्य न केल्यास याचे परिणाम गंभीर होतील. असे असूनही तब्बल 142 शिक्षकांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळेच आता प्रशासनाने याला गंभीर निष्काळजीपणा असे म्हटले आहे.

प्रशासनाने असेही म्हटले आहे की, या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर, सध्या जनगणनेच्या कामात व्यग्र असलेल्या शिक्षकांवरही या गोष्टीचा परिणाम होणार आहे. सदर प्रकरणी दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद म्हणाले की, जनगणना हे देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. परंतु ते असेही म्हणाले की, काही ठराविक व्यक्तींची निकड पाहता काहींवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. आज तक ने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे, संबंधित अतिथी शिक्षकांचे म्हणणे आहे की, अद्याप त्यांना बडतर्फ करण्याबाबत कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. दिल्लीतील सरकारी शिक्षक संघटनेनेही या निर्णयाला विरोध केला आहे. संघटनेचे सरचिटणीस अजय वीर यांनी सांगितले की, हे सर्व शिक्षक वार्षिक करारावर काम करत आहेत, हा करार 8 मे रोजी संपत आहे. ते म्हणाले की, शिक्षकांनी हेतुपुरस्सर काम करण्यास नकार दिला नाही. तर कमी पगार, संसाधनांची कमतरता आणि व्यावहारिक अडचणींमुळे त्यांनी या कामाकरता नकार दिला आहे.

या संदर्भात अधिक बोलताना वीर यांनी स्पष्ट केले की, गेल्या 8 वर्षांपासून अतिथी शिक्षकांच्या मानधनामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच त्यांचा सध्याचा पगार इतका कमी आहे की, प्रवासासारखा मूलभूत खर्च भागवणेही कठीण झाले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या शिक्षकांवरील प्रस्तावित कारवाई मागे घ्यावी, त्यांना नियमित पगार मिळत राहावा आणि जनगणना कर्तव्यासाठी अतिरिक्त मानधन मिळावे. तसेच शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की, अतिथी शिक्षक आधीच तात्पुरत्या रोजगारावर काम करतात. अशा टोकाच्या कारवाईचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि मनोधैर्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.