Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा
Satara,Maharashtra,India

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून दिलासा

शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची तहसीलदार व निवासी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून दिलासा

सातारा : निवडणूक प्रक्रियेचे आदेश आणि सीटीईटी पात्रता परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक शिक्षक परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना न्याय मिळावा आणि परीक्षेला वंचित राहावे लागू नये, यासाठी शिक्षक समन्वय समिती, सातारा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार समीर यादव तसेच निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेण्यात आली. 

या भेटीत शिक्षकांच्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. सीटीईटी ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची पात्रता परीक्षा असून निवडणूक आदेशांमुळे परीक्षा देणे अशक्य होऊ नये, अशी ठाम भूमिका शिक्षक संघटनांनी मांडली.

प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सहानुभूतीपूर्ण विचार करण्याचे आश्वासन दिले. BLO ची ऑर्डर असणारे शिक्षक तसेच जे शिक्षक सीटीईटी परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि ज्यांची परीक्षा ७ व ८ तारखेला आहे, अशा शिक्षकांचे त्या दिवसासाठी निवडणुकीचे आदेश रद्द करून त्यांना परीक्षेला उपस्थित राहण्याची संधी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात प्रशासनाकडून संबंधित शिक्षकांची माहिती तातडीने गोळा करण्यात येणार असून, एका वेळी दोन्ही जबाबदाऱ्या असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याची प्रक्रिया तत्काळ राबवली जाईल, असेही सांगण्यात आले.

या बैठकीसाठी तब्बल ७० शिक्षक तहसील कार्यालय, सातारा येथे उपस्थित होते. शिक्षकांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून आपली समस्या मांडली. यावेळी सातारा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोहर माने, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आवाज शिक्षकांचा चे जिल्हा प्रतिनिधी हनमंत रसाळ, सातारा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष तातोबा भिसे,  तसेच रवींद्र कुंभार, अमर वंजारी, तानाजी सराटे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तहसीलदार समीर यादव आणि उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून आजच परीक्षार्थी शिक्षकांची यादी तयार करण्याचे आदेश दिले. तसेच जे शिक्षक परीक्षेला बसणार नाहीत, मात्र त्यांच्याकडे निवडणुकीचे आदेश नाहीत, अशा शिक्षकांच्या ठिकाणी योग्य ते आदेश काढून नियोजन करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

या निर्णयामुळे सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून शिक्षक संघटनांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.