pune,Maharashtra,India
टीईटी पुढे ढकलली
NEET परीक्षेमुळे परीक्षा वेळापत्रकात बदल; आता २८ जून रोजी होणार परीक्षा

पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 संदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धी निवेदन जारी केले असून, पूर्वनियोजित परीक्षा दिनांकामध्ये बदल करण्यात आला आहे.
पूर्वी रविवार दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता रविवार दि. २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही परीक्षा आणि त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरील NEET परीक्षा National Testing Agency (NTA) मार्फत देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याने, अनेक परीक्षा केंद्रे समान असल्याचे निदर्शनास आले. परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने म्हटले आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
🔹 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचा कालावधी : दि. १६ जून २०२६ ते दि. २८ जून २०२६
🔹 शिक्षक पात्रता परीक्षा – पेपर १ : रविवार दि. २८ जून २०२६
वेळ : सकाळी १०:३० ते दुपारी १:००
🔹 शिक्षक पात्रता परीक्षा – पेपर २ : रविवार दि. २८ जून २०२६
वेळ : दुपारी २:३० ते सायंकाळी ५:००
परीक्षेच्या वेळापत्रकात प्रशासकीय कारणास्तव बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे. परीक्षार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.