Loading...
ब्रेकिंग न्यूज :
राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा
Satara,Maharashtra,India

बीएलओ ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू, शिक्षक संतप्त

बीएलओ ड्युटीवर असलेल्या  शिक्षिकेचा मृत्यू, शिक्षक संतप्त

अहिल्यानगर : महाराष्ट्रामध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला सुरुवात होताच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बीएलओ (Booth Level Officer) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सुनिता पोपटभट यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेनंतर राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शाळेतील अध्यापनासोबतच मतदारयादी तपासणीसारखी अतिरिक्त कामे शिक्षकांवर लादली जात असल्याने प्रचंड मानसिक ताण निर्माण होत असल्याची तक्रार शिक्षक संघटना सातत्याने करत आहेत.

शाळाबाह्य कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता एका शिक्षिकेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून केला जात आहे.

माहितीनुसार, रविवारी (28 जून) सुनीता पोपळभट यांनी बीएलओचे साहित्य ताब्यात घेतले होते. त्यानंतर मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या कामाचा वाढता दबाव आणि सततचा तणाव यामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मंगळवारी (30 जून) त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले.

या घटनेनंतर प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामे करताना शिक्षकांना सरकारी कर्मचारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या जातात, मात्र संकटाच्या वेळी त्यांना कोणतेही स्पष्ट संरक्षण किंवा सुरक्षा हमी दिली जात नाही.

पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्य बजावताना मिळणारे सर्व कायदेशीर संरक्षण, विमा लाभ आणि तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासोबतच बीएलओ म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना 'ऑन ड्युटी' संरक्षणाची लेखी हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, बीएलओ कामात हलगर्जीपणा झाल्यास काही ठिकाणी शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मतदारयाद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेचे काम अत्यंत अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचा दबाव असल्याने शिक्षकांमध्ये भीती आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका शिक्षिकेचा जीव गेल्यानंतर आता शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारी काम करताना जबाबदारी आमची, पण संरक्षण कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

या गंभीर घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना सुरक्षा, विमा आणि कायदेशीर संरक्षण मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.