Satara,Maharashtra,India
जावलीतील जि.प. शाळेचे बांधकाम कोसळून महिला ठार
जि. प. शाळा ओझरे येथे दुर्घटना

जावळी, सातारा : जावळी तालुक्यातील ओझरे येथे बुधवारी (दि. २२ एप्रिल २०२६) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सिमेंटच्या विटांचे बांधकाम पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे कोसळून त्या खाली उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर पडले. या अपघातात शांताबाई बाबुराव लकडे (वय ६२, रा. ओझरे, ता. जावळी) यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगल तसेच गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मेढा येथे पाठविण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.