Loading...
ब्रेकिंग न्यूज :
टीईटीचा 'तो' निकाल रद्दच; मात्र उमेदवारांवरील परीक्षा बंदी उठवली राष्ट्रपिता महात्मा गांधी... 'बापू' जमल तर आम्हाला माफ करा!! गांधी विचार, आधुनिक शिक्षणपद्धती, समाज आणि पालकांची मानसिकता शिरूर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांची डफळापूर शाळेस भेट सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय ठरले मुक्त विद्यापीठाचे यशस्वी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे दहावीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न हादवे दाम्पत्याकडून काहीर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना २० डझन वह्यांचे वाटप जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत निगडी खुर्द केंद्रशाळेचे दुहेरी यश केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मायणीच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेची चमकदार कामगिरी 'विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अभियानांतर्गत ऑनलाइन, अशैक्षणिक कामावर बहिष्कार यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोरगिरी येथे उत्साहात संपन्न 'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम
Satara,Maharashtra,India

कोकणातील शिक्षिका अद्याप बेपत्ता झेंडावंदनानंतर झाल्या होत्या गायब

कोकणातील शिक्षिका अद्याप बेपत्ता  झेंडावंदनानंतर झाल्या होत्या गायब

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे 34 वर्षीय विवाहित शिक्षिका बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आली आहे. पूजा अनिल पोवार असे बेपत्ता महिलेचे नाव असून त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत.

1 मे रोजी शाळेत झेंडावंदन केल्यानंतर अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती आहे. पतीसह  त्यांचा आठ वर्षांचा लेक व्याकूळ झाल्याची माहिती आहे. प्रवाह न्यूजने हे वृत्त दिले आहे.


पतीची पोलिसात तक्रार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या पूजा अनिल पोवार 1 मे पासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


शाळेत गेल्या, परतल्याच नाहीत

वैभववाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा पोवार या सोनाळी येथील चव्हाणवाडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्या एक मे रोजी सकाळी शाळेत आल्या होत्या. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.


पोलिसांकडून माहिती पुरवण्याचं आवाहन

पोवार कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर दोन मे रोजी त्यांचे पती अनिल पोवार यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल केली.  पोलिसांनी फोटो शेअर करत शिक्षिका कुठे निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात केले आहे.


शिक्षिकेचा फोन बंद

दरम्यान, वैभववाडी पोलिसांकडून महिलेला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे.  त्यामुळे ही त्या नक्की कुणीकडे गेल्या आहेत, हे अद्याप समजू स्पष्ट झालेले नाही. वैभववाडी पोलिसांना या संदर्भात काही वेगळी माहिती मिळाली असून त्यांच्या नातेवाईक व कुटुंबीयांना यासंदर्भात वैभववाडी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या सगळ्या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनाळकर करीत आहेत.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.