जि. प. मुख्याध्यापकांचा लेझीम शिकवताना मुलांसमोरच हृदयविकाराने मृत्यू बीड,धारूर : शाळेच्या मैदानावर मुलांचा लेझीमचा खेळ सुरु असताना त्यांना लेझीम शिकवणाऱ्या मुख्याध्यापक संतोष आणेराव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एक डाव पूर्ण होतो ना होतो, तोच ते अचानक जमिनीवर कोसळले आणि पुन्हा उठलेच नाहीत.
शिक्षकांना आता मोफत एसटी प्रवास मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना एसटी बसने प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात शिक्षकांसह ग्रामसेवकांचाही समावेश आहे.
टीईटी निकाल जाहीर पुणे : सन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि.२३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.