रोज 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचण्याचा शिक्षण खात्याचा आदेश बेळगाव : कर्नाटक राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य करणारा आदेश शालेय शिक्षण खात्याने जारी केला आहे. मुलांनी सकाळच्या प्रार्थनेवेळी रोज 10 मिनिटे वर्तमानपत्रांचे वाचन करावे लागणार आहे.