शिक्षक विशाल भगत यांनी विहिरीत उडी घेत वाचवले ८० वर्षीय महिलेचे प्राण! सातारा : शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना विहिरीत बुडत असलेल्या ८० वर्षीय महिलेला वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेवाडी येथील शिक्षक विशाल युवराज भगत यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.